Location: At Post – Korti, Taluka – Karmala, Dist. Solapur
Founder President: Mrs. Jayashri Laxman Bagade
Project Co-ordinator: Mr. Rohit Laxman Bagade, B Com, M Ed. (MR)
Establishment Year: 2011
Registration No.: F/17129/Thane dated 27/04/2009. (Registered under Charity Commissioner Act 1950)
Present Strength: 25 Male (6-18 years) intellectually disabled orphans or form poor rural families under the care of dnyanprabodhan.

Intellectual disability is most neglected disability. Mainly in rural area the situation is worst due to lack of knowledge & misbeliefs. Mrs. Bagade was touched with few incidences seen at her native village, she got emotionally disturbed & restless about the conditions of these unfortunate children particularly in villages.
She decided to create the residential facility with self help training & education for these children at her native place at Korti, Solapur. She had done survey of nearby villages & found that 150 -200 poor families having intellectually disabled child. In the year 2011 she started the facility for intellectually disabled children (between 6-18 years). Presently Dnyanprabodhan is taking care 25 intellectually disabled children from poor families. Mr. Rohit Bagade, Son of Mrs. Jayashri Bagade Co-ordinating the project very enthusiastically with lot of courage & patience with the support of his team.

“आधार” एक संजीवनी

“आधार” ह्या शब्दातच एक समाधान आणि संरक्षण दडलेलं आहे आणि त्याच समाधान आणि संरक्षणाची भिंत आज आधारने ज्ञानप्रबोधनच्या भोवती रोवली आहे..सांगायचंच झालं तर एक किस्सा असा सांगावासा वाटतो की आधार या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.विश्वास गोरे सर यांची आणि माझी पहिली भेट फेसबुक या सोशल मीडियाच्या माध्यमातून झाली…माणसाने किती नम्र आणि आदरयुक्त असावं याच जिवंत उदाहरण म्हणजे  श्री.विश्वास गोरे सर त्याच प्रमुख कारण म्हणजे मी जेव्हा फेसबुकच्या माध्यमातून मेसेज करून जेव्हा त्यांना भेटण्याची इच्छा दर्शवली त्यावेळी पुढच्या क्षणीच सरांकडून एक मेसेज आला तो होता त्यात त्यांचा संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक होता आणि खाली एक वाक्य लिहिलं होत ते म्हणजे… “फोन करून कधीही ये बेटा”

त्यावेळेस हा माणूस आभाळाहून मोठा वाटला मला… मला पण ही सोनेरी संधी दवडायची नव्हती म्हणून मी ही त्यांना भेटण्यास पोहोचलो आणि त्या भेटीतच मी सरांचा फॅन झालो…!!

ज्ञानप्रबोधनचं संपूर्ण काम सरांनी शांतपणे समजून घेतल्यानंतर ते म्हणाले “रोहित मी एकदा नक्कीच ज्ञानप्रबोधनला येईन” पण त्याआधी तू नक्कीच “आधार” ला भेट दे…मी ही वेळ न जाऊ देता भेटीच्या दुसऱ्याच दिवशी “आधार” ला भेट द्यायला निघालो..जे दैवी कार्य फक्त फोटोतच पहावयास मिळायचं ते आज प्रत्यक्षात बघायला मिळतंय याचा आनंद काही वेगळाच होता…त्यादिवशी आधार माझ्या डोळ्यात नाही मावलं तर या शब्दात काय मावणार…??

इतकंच ह्या क्षणी जाणवतंय…विशेष मुलांसाठी एक संजीवनी असलेले हे सेवाकार्य समजून घ्यायचं असेल तर एकदा “आधार” ला जाऊन यावं..तो एक स्वर्ग आहे इतकंच म्हणेन मी…!!

त्या भेटीनंतर काही दिवसातच आपल्या ज्ञानप्रबोधन या २५ विशेष मुलांसाठी ग्रामीण भागात कार्य करणाऱ्या संस्थेला “आधार” ची टीम तब्बल ३५० किमी प्रवासाचा टप्पा पार करून भेटण्यास आले. ज्ञानप्रबोधनला आल्यानंतर आणि आजूबाजूचा परिसर पाहिल्यानंतर तसेच प्रकल्प चालवित असताना येणाऱ्या
अडी-अडचणींचा आढावा घेतल्यानंतर त्यावेळी ते इतकंच म्हणाले…

“रोहित “आधार” चा “आधार” तुला यापुढे नक्कीच राहील” आणि त्या भेटीनंतर अगदी सात दिवसांच्या आतच त्यांनी आपल्या चिमुकल्यांना एक नवसंजीवनी दिली आहे तीही तात्पुरती नसून कायम स्वरूपाची आहे इतकंच ह्या माध्यमातून सांगेन…!!

“आधार” च्या छत्रछायेत आलेलं “ज्ञानप्रबोधन” आणि त्यातली ही निरागस लेकरं आणि स्वतः मी कायम आपला ऋणी राहील…!!

“आधार” च्या ह्या सेवाकार्याला ह्या छोट्या कार्यकर्त्यांकडून मनापासून शुभेच्छा…!!

रोहित बागडे
समन्वयक
ज्ञानप्रबोधन मतीमंद विकास विद्यालय