Location : At Sonbardi, Post – Hanumankhede BK, Taluka Eradol, Dist. Jalgaon – 425109
Founder & Secretary : Mr. Samadhan Sawant –B Ed., Special Education
Establishment Year : 2015
Registration No.: F/17685/Jal dated 23/11/2015. (Registered under Charity Commissioner Act 1950)
Present Strength: 20 Male intellectually disabled form poor rural families under the care of Sahawas.

Mr. Samadhan Sawant was working at residential school for specially abled in Mumbai. While working in the city like Mumbai, he always used to compare the facilities available with the facilities available at rural / village area. One day he took a bold decision of quiting job and go back to native & go back to native to do something for special ones in rural area. In the year 2015 he started ‘Sahawas bahuddeshiya Sanstha’ a residential facility with the help of few of his local friends from Sonbardi.

One of the philanthropic person from his village made his premises available for starting residential school on nominal rent. Today he has 20 intellectually disabled children from poor families from nearby area. Most of the parents are daily wages workers and cannot afford to pay any amount of fee for their children.

Against all the odds Mr. Samadhan Sawant & his team have manage to survive for 4 years. Sahawas has waitlist of 25 more children wanting to get admitted.

One of the donors has donated 1 acre of land to Sahawas. Mr. Samadhan Sawant & his team have a plan of constructing their own building on the same plot to take care of 50 specially abled adult/children.

ग्रामीण भागातील मतिमंद मुलांचा आधारस्तंभ

मतिमंदत्व म्हटलं कि परावलंबन हे आलंच, मग ते शारीरिक, मानसिक आणि काहीवेळा आर्थिकही असू शकत. हि परिस्थिती जर ग्रामीण भागातील अठरा विश्व दारिद्र्य असणाऱ्या ग्रामीण भागातील मोलमजुरी करणाऱ्या किंवा गरीब शेतकऱ्याच्या पोटी जर असे मतिमंद बाळ जन्माला आले तर……. कल्पना देखील करवत नाही. शेतात मोलमजुरी करणारा पालक आपल्या मुलाला सांभाळू शकत नाही. निवासी ठेवायला पैसे नाहीत, मग अशात कुठे निरनिराळ्या चिकित्सा आणि विशेष शिक्षक ठेवणार? मग फिरतात मुलं बसस्टॉप आणि रानावनात. काही माणुसकी शून्य लोकांच्या गमतीचा विषय बनतात. ग्रामीण भागातील हीच वास्तविकता आहे.

हा सर्व प्रत्यक्ष जवळून आलेला अनुभव पाहून, आतला खरा माणूस थांबणार कसा? या मुलांसाठी काम करण्याचा माझा निर्णय ठाम झाला. ज्या वयात मुलं नोकरीसाठी धडपड करतात त्या वयात मी नोकरीचा राजीनामा दिला. नातेवाईकांनी वेड्यात काढलं, घरातील मंडळीही माझ्या निर्णयावर काही विशेष खुश नव्हती. पण माझ्या आत असलेलं सामाजिक कार्याचं भूत मला शांत स्वस्थ बसू देत नव्हतं, गरीब पालक वर्गाचा शोध सुरु केला . काही मुलं अनाथ तर काही खूप गरीब ज्यांना खऱ्या अर्थाने गरज आहे अशी जवळ जवळ ५९ मुलं मिळाली.

असं म्हणतात आपण करीत असलेल्या कार्याची दखल भगवंत घेत असतो, हेतू शुद्ध असेल आणि कार्य प्रामाणिक असेल तर कुठल्या न कुठल्या मार्गाने देव धावून येतो. १७ वर्ष बंद अवस्थेत असलेली हॉटेलची इमारत आम्हाला वापरण्यासाठी एका सज्जन माणसाने देऊ केली. दुरुस्ती करून त्यात मुलांना त्यांच हक्काच घर मिळालं. ग्रामीण भागट कुणीही मदतीला पुढे आलं नाही. मुंबई ते जळगाव महिन्यातून ४ फेऱ्या होत असतात. सकाळी उठल्यापासून तर रात्री झोपे पर्यंत लागणाऱ्या सर्व जीवनावश्यक वस्तू आजही मुंबई भागातील दात्यामुळे शक्य होत आहे. आज सहवासाला ४ वर्ष झालीत. एक एकर जमीन या मुलांच्या मदतीसाठी दैवी माणसाच्या मदतीने बहाल झाली. पण निधी अभावी बांधकाम करता आल नाही. खूप अडचणी आल्या पण निस्वार्थ कामाला देव पाठीशी असतो आति तोच मार्ग दाखवत असतो.

आदरणीय विश्वासजी गोरे सर (अध्यक्ष, आधार मुंबई) गेल्या २ वर्षांपासून आमची धडपड आणि प्रामाणिकपणा पाहत होते. श्री. विश्वास गोरे सर आणि विश्वस्त यांनी सहवासाचे कार्य, ग्रामीण भागातील पालकांची हतबलता आणि विशेष मुलांची दयनीय अवस्था याची प्रत्यक्ष भेट देऊन पडताळणी केली. सहवासला संयुक्तपणे आधारची साथ मिळाली. ग्रामीण भागातील मतिमंद मुलांच्या चेहेऱ्यावर आनंद निर्माण झाला. सहवासला खऱ्या अर्थाने आधार मिळाला.

आज सहवासमध्ये २० निवासी मूल आहे. रस्त्यावर, बसस्टॉप वर फिरणाऱ्या मतिमंद मुलांना आधाररूपी आधार मिळाल्याने त्यांच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण झाला. त्या मुलांवर होणार खर्च आधारच्या मदतीने होतोय, इतकच नाही या मुलांना व्यावसायिक शिक्षण देण्यासाठी आधारने व्यावसायिक युनिट सहवासमध्ये सुरु करून मुलांमध्ये नव्याने उत्साह आणि चेतना निर्माण केली आहे. आधार संस्था खऱ्या अर्थाने ग्रामीण भागातील गरीब मतिमंद मुलांसाठी दैवी रुपी उभी आहे. याचा मनस्वी आनंद होतो. आधारस्तंभ असलेल्या आधारला नतमस्तक.

समाधान सावंत
संस्थापक
सहवास बहुउद्देशीय संस्था, जळगाव